'राग दरबारी'चे सूर...
टीप - हे काही पुस्तक परीक्षण नाही. मराठी साहित्यातले अनेक प्रकार, अनेक कलाकृती आपण वाचलेल्या असतात. त्याचं रसग्रहण केलं असतं. पण मराठी वगळता इतर भारतीय भाषांमधल्या साहित्यकृतींबद्दल आपण बऱ्याचदा अनभिज्ञ असतो. (सन्माननीयांनी स्वत:ला अपवाद समजून यातून स्वत:ला वगळावं.)
याच विचारातून एक उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याला एक हिंदी पुस्तक किंवा कवितासंग्रह वाचून मराठीतून त्याची ओळख वाचकांना करून द्यायची. त्या निमित्ताने हा प्रयत्न...
----------------------------------------------------------------------------
काही गोष्टी अशा असतात की, 'अरेच्चा, आत्तापर्यंत आपण या गोष्टींना का मुकलो होतो,' असं वाटून जातं. कधीकधी माणसांच्या बाबतीतही असं होतं. म्हणजे असं एखादं माणूस भेटतं की वाटतं, 'अरे, या माणसाला आधी भेटायला हवं होतं यार...' अर्थात पुस्तकंही याला अपवाद नाहीत. असंच एक पुस्तक हाती लागलं आणि हिंदी लिहिता-वाचता येत असूनही, वाचनाची भरपूर आवड असूनही आपण इतकी वर्ष हिंदी पुस्तकं का वाचत नव्हतो असं वाटलं. ही कादंबरी आहे आणि तिचं नाव 'राग दरबारी'!
हिंदी पुस्तकं वाचून त्यांची ओळख मराठी जगताला करून देण्याचा माझा पहिला प्रयत्न म्हणजे 'तमस'! हिंदी साहित्याचं कवाड या कादंबरीमुळे माझ्यासाठी खुलं झालं. या कादंबरीबद्दल लिहिल्यानंतर माझी मैत्रिण सुधा तिवारी हिने आवर्जून मला तीन कादंबऱ्या भेट म्हणून पाठवल्या. त्यात होतं हे 'राग दरबारी'!

यंदा या कादंबरीचं हे पन्नासावं वर्ष आहे. 'आहा, अमुचे मराठी साहित्य किती थोर' या धुंदीत असलेल्या आपल्याला या घटनेचं महत्त्व चटकन लक्षात येणार नाही. पण हिंदी साहित्यसृष्टीत ही घटना चांगलीच 'सेलिब्रेट' केली जात आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी लेख लिहून ही कादंबरी आजही कशी तेवढीच चपखल आणि समर्पक आहे, याचं वर्णन केलं आहे. त्यात काही मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांचाही समावेश आहे.
इंडियन एक्सप्रेसने या कादंबरीबद्दल खूप छान लिहिलं आहे
श्रीलाल शुक्ल यांनी १९६४मध्ये लिहायला घेतलेली ही कादंबरी तीन वर्षांनी म्हणजे १९६७मध्ये लिहून पूर्ण झाली. ही कादंबरी प्रकाशित झाली १९६८मध्ये आणि पुढल्याच वर्षी तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पन्नास वर्षांमध्ये तिच्या पाच लाखांहून जास्त प्रति खपल्या आहेत. पण या कादंबरीचं मोल त्याच्याही पलीकडे आहे.
श्रीलाल शुक्ल हे मूळचे लखनऊतल्या अजरौली गावातले. अलाहाबाद (नामांतरानंतर प्रयागराज - लोकांच्या भावना दुखू नयेत म्हणून... आपण बाबा घाबरतो भावनाविवश लोकांना.) विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. ज्ञानपीठ, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. सन्मानांच्या पलीकडे जाऊन मला भावली ती व्यंग टिपणारी त्यांची भन्नाट नजर.
हे पुस्तक हातात घेतल्यापासून जो हिंदी भाषिक मला भेटत होता, तो 'वाह, काफी अच्छी किताब हैं... अलग ही लेव्हल की हैं' असं आवर्जून सांगत होता. एवढं काय आहे बाबा या पुस्तकात, याच भावनेतून पहिलं पान वाचायला घेतलं आणि अक्षरश: पहिल्या परिच्छेदापासून या पुस्तकात रमायला सुरुवात झाली.
याला कारण होतं, पहिलंच वाक्य. ते होतं, 'शहर का किनारा। उसे छोडते ही भारतीय देहात का महासागर शुरू हो जाता था।' त्यांनी कुठेही कोणत्याही राज्याचा उल्लेख न करता सगळ्या भारताचं चित्र या एका वाक्यात रेखाटलं आहे. शहराच्या वेशीवर असलेले प्रदेशही अजून कसे ग्रामीण आहेत, हे बघायला फार लांब जायचीही गरज नाही. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या गायमुख वगैरे भागांमध्ये चक्कर टाकली, तरी सहज दिसतं.
श्रीलाल शुक्ल यांनी व्यंगात्मक शैलीत अख्खी कादंबरी लिहिली आहे. नव्हे, त्यांनी जी पात्रं रेखाटली आहेत, ती त्यांच्या वास्तविक जीवनातही कदाचित याच शैलीत बोलत असतील. मराठी माणसाला ही शैली काही अनोळखी नाही. द. मा. मिरासदार किंवा शंकर पाटील यांच्या कथा वाचलेल्यांना किंवा जयवंत दळवी-पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातील काही इरसाल नमुन्यांना भेटलेल्यांना या शैलीचा सहज परिचय असावा. ती तिरकस तर आहेच, पण प्रचंड नागडी-उघडी आहे. वास्तवाची जाणीव अगदी परखड शब्दांत करून देणारी आहे.
कादंबरी सुरू होते तेच रंगनाथ नावाच्या पात्रापासून. शहरातल्या कॉलेजमध्ये शिकणारा रंगनाथ तब्बेत सुधारण्यासाठी आपल्या मामांच्या गावी जात आहे. त्यासाठी त्याने एका ट्रकवाल्याकडून लिफ्ट मागितली आहे. या ट्रकचं वर्णन करताना शुक्ल लिहितात,
या ट्रकबरोबर आपणही शिवपालगंज या तालुकावजा गावात पोहोचतो आणि आपल्याला एक एक नमुने भेटायला सुरुवात होते. हे शिवपालगंज शहरापासून साधारण दोन तासांच्याच अंतरावर आहे. शुक्ल यांच्या कल्पनेतलं शिवपालगंज कदाचित आता शहराच्या हद्दीतही आलं असेल, एवढा शहरांचा विस्तार झाला आहे. पण तरी त्या शिवपालगंजपासून दोनच तासांच्या अंतरावर नवं शिवपालगंज आजही आहे. एक प्रकारे शिवपालगंज देशातल्या सगळ्याच खेड्यांचं प्रतिनिधित्त्व करतं.
शिवपालगंजवर सत्ता आहे वैद्यजी यांची! त्यांच्यावर शिरजोरी करण्यासाठी शिवपालगंजच्या हद्दीतल्याच भिखमखेडवी गावातला रामदिनही आहे. वैद्यजीच्या आशीर्वादाने चाललेलं छंगामल कॉलेज आहे. वैद्यजींच्याच आशीर्वादाने वागणारा आणि चालणारा कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, वैद्यजींचा छोटा मुलगा आणि कॉलेजच्या पोरांचा लिडर बनू पाहणारा रुप्पन बाबू आहे, वैद्यजींचा मोठा मुलगा आणि गावच्या व आसपासच्या सर्व गुंडांचा गुरू बद्री पेहेलवान आहे, त्याचा खास चेला छोटे पेहेलवान आहे, छोटेचा बाप कुसहरप्रसाद आहे, वैद्यजींच्या घरी 'नाथाघरच्या पाणक्या'च्या अवस्थेत राबणारा आणि सदैव अंडरवेअरवर असलेला सनिचर आहे. (याचं खरं नाव मंगलदास, पण गाव याला सनिचर) याच नावाने ओळखतं. वैद्यजी आणि रामदिन या दोन बैलांच्या झुंजीत हात न घालता कुंपणावर बसणारा गयादिन आहे, त्याची मुलगी बेला आहे, प्रिन्सिपलच्या विरोधी गटातले खन्ना मास्टर आणि मालवीय मास्टर आहेत.
यातली बेला वगळता सगळी पात्र इरसाल आहेत. बारा गावचं पाणी पिऊन वेळप्रसंगी दुसऱ्याला पाणी पाजणारी आहेत. राजकारणातले डावपेच खेळून दुसऱ्याला धोबीपछाड देणारी आहेत. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला परमार्थाला लावणारी आहेत. थोडक्यात मानवी स्वभावाचे जवळपास सगळे कंगोरे श्रीपाल शुक्ल यांनी या पात्रांच्या माध्यमातून मांडले आहेत.
शुक्ल या पात्रांच्या माध्यमातून लोकतंत्र, लोकशाही, प्रजासत्ताक, राजकारण, शिक्षणव्यवस्था, प्रेम, दारूबंदी, शेतीची प्रगती, सरकारी योजना यांचा खरपूस समाचार घेतात. त्यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली, तो काळही लक्षात घ्यायला हवा. तो काळ होता १९६४चा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेमतेच १६-१७ वर्षांनंतरचा!
शुक्ल यांचा जन्म १९२५ सालचा! म्हणजे या वेळी ते ३९ वर्षांचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या १०-१२ वर्षांमध्ये लोकांच्या स्वप्नांचा झालेला भ्रमनिरास त्यांच्या पिढीने अनुभवला होता. गोरा साहेब जाऊन त्याच्या जागी काळा साहेब आला, एवढाच काय तो बदल घडला, हे वास्तव ते पाहत होते, टिपत होते. ही बोच या कादंबरीत उतरली आहे.
कादंबरी वाचताना अनेकदा जयवंत दळवी यांच्या 'सारे प्रवासी घडीचे' या कादंबरीची आठवण होते. खासकरून सनिचरला वैद्यजी गावचा प्रधान बनवतात, तो प्रसंग वाचताना तर खूपच. 'सारे प्रवासी घडीचे' मधल्या केशा चांभाराची निवडणूक आणि सनिचरची प्रधानपदी झालेली निवडणूक, हे प्रकरण तर भन्नाट आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने शुक्ल यांनी निवडणूक जिंकण्याचे तीन हमखास 'देहाती' फॉर्म्युले लिहिले आहेत. त्याला त्यांनी गावांची नावंही दिली आहेत. रामनगरवाला, नेवादावाला आणि महिपालपूरवाला! थेट पक्षीय बलाबलाचा विचार करून त्यांचे सगळे लोक तुरुंगात पोहोचवायचे आणि आपलेही तेवढेच लोक तुरुंगात पोहोचवायचे. आपल्या बाहेर असलेल्या लोकांच्या जीवावर निवडणूक जिंकायची, हा रामनगरवाला फॉर्म्युला. नेवादावाला फॉर्म्युला त्या काळचे आणि आताचेही राजकारणी हमखास वापरतात. तो म्हणजे आपल्यामागे धर्माचं अनुष्ठान आहे, असं सांगणारा एखादा बुवाबाबा पकडणे आणि महिपालपूरवाला फॉर्म्युला म्हणजे मतदान केंद्रावरची घड्याळं पुढे करून ठेवणे आणि प्रतिपक्षाचे मतदार येण्याआधीच निवडणूक आटपून घेणे. (आजकाल ईव्हीएम मशीनमध्ये होणाऱ्या 'तांत्रिक बिघाडां'सारखंच काहीसं). आश्चर्य वाटेल, पण आजही गावागावांमध्ये हे फॉर्म्युले थोड्याबहुत फरकाने वापरले जातात.
आणखी एक नामी किस्सा येतो कुसहरप्रसादने आपल्याच मुलावर, छोटे पेहेलवानवर केलेल्या मारहाणीच्या आरोपाचा! या आरोपाची सुनावणी पंचांसमोर होते. पंच कुसहरप्रसादला काही उलटसुलट प्रश्न विचारतात. आपल्या बापाची चाललेली नाचक्की सहन न होऊन छोटे पेहेलवान पंचांना दमात घेतो आणि आपल्या बापूला घेऊन घरी जातो.
यात रुप्पन-बेला-बद्री असा प्रेमाचा त्रिकोणही येतो आणि लुप्त होतो. पण राजकारणात प्रेमासारख्या भावनेचाही वापर कसा बेमालुमपणे केला जातो, हेदेखील शुक्ल लिहून जातात. गावाची गोष्ट सांगण्याच्या बहाण्याने शुक्ल आधुनिक भारतात रसातळाला जाणाऱ्या मूल्यांबद्दल लिहून जातात. वानगीदाखल काही नमुने...
हे आणि असे अनेक चिमटे घेत श्रीलाल शुक्ल आपल्याला पावलोपावली वास्तवाची जाणीव करून देतात.
'राग दरबारी' वाचताना एक गोष्ट सातत्याने जाणवत होती. ती म्हणजे श्रीलाल शुक्ल यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली साधारण ५४ वर्षांपूर्वी! काही तपशील वगळता ही कादंबरी, त्यातली पात्रं, त्यातली ठिकाणं आणि मुख्य म्हणजे या कादंबरीच्या अनुषंगाने येणारे मुद्दे आजच्या काळाला तंतोतंत लागू पडतात. गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये झालेली आपली 'प्रगती' आणि 'विकास' ही किती वरवरची होती, मूलभूत गरजा सोडून ती कशी वेगळ्याच गोष्टींमधून मोजली गेली, हे खूप मस्त लक्षात येतं.
शाळा-कॉलेजांमध्ये होणाऱ्या लाथाळ्या, शिक्षणाचं अवमूल्यन, कॉ-ऑपरेटीव्ह सोसायट्यांमध्ये होणारे भ्रष्टाचार, वैद्यजींसारखे स्थानिक गावगुंड, त्यांच्या हाताखालचे पित्ते, हे शुक्ल यांनी केलेलं एका छोट्याश्या गावातलं काल्पनिक चित्रण काल्पनिक न राहता वास्तववादी बनतं. शिवपालगंजला काही अंशांनी गुणलं की आपला देश दिसायला लागतो आणि मग शिवपालगंजमधली ही परिस्थितीही गुणाकार होऊन आSS वासून समोर उभी राहते.
या परिस्थितीवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण काहीच तोडगा काढला नाही. उलट सिमेंटचे रस्ते, मॉल, काचेच्या इमारती म्हणजे विकास अशा भ्रामक कल्पनांमध्ये रमलो, हे आपलं अपयश की, आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या देऊन त्याच स्थितीत ठेवून स्वत: मात्र विकासाची नवनवीन शिखरं गाठणाऱ्या आपल्यातल्याच काहींचं यश, हे कळेनासं होतं.
'राग दरबारी'च्या या सूरांनी काही काळ हसायला येतं, हसता हसता अंतर्मुख व्हायला होतं आणि मग नकळत मन खिन्न होतं. हेच श्रीलाल शुक्ल यांच्या लेखणीचं यश म्हणायला हवं.
(ता. क. - हे पुस्तक वाचताना अनेक हिंदी शब्द अडले. गूगल साहेबांनीही त्या शब्दांचा अर्थ सांगायला नकार दिला. अशा वेळी माझे मित्र प्रभात पांडे, सुधा तिवारी यांनी अक्षरश: रात्री-अपरात्रीही त्या शब्दांचे अर्थ सांगितले. त्यांचे आभार.)

'उसे देखते ही यकीन हो जाता था, इसका जन्म केवल सडकों के साथ बलात्कार करनें के लिए हुआ है। जैसे कि सत्य के होते हैं, इस ट्रक के भी कई पहलू थे। पुलिसवाले उसे एक ओर से देखकर कह सकते थे कि वह सडक के बीच में खडा है, दुसरी ओर से देथकर ड्राइवर कह सकता था कि वह सडक के किनारे पर है। चालू फैशन के हिसाब से ड्राइवर ने ट्रक का दाहिना दरवाजा खोलकर डैने की तरह फैला दिया था। इससे ट्रक की खूबसूरती बढ गई थी, साथ ही यह खतरा मिट गया था कि उसके वहाँ होते हुए कोई दूसरी सवारी भी सडक के ऊपर से निकल सकती है।'
या ट्रकबरोबर आपणही शिवपालगंज या तालुकावजा गावात पोहोचतो आणि आपल्याला एक एक नमुने भेटायला सुरुवात होते. हे शिवपालगंज शहरापासून साधारण दोन तासांच्याच अंतरावर आहे. शुक्ल यांच्या कल्पनेतलं शिवपालगंज कदाचित आता शहराच्या हद्दीतही आलं असेल, एवढा शहरांचा विस्तार झाला आहे. पण तरी त्या शिवपालगंजपासून दोनच तासांच्या अंतरावर नवं शिवपालगंज आजही आहे. एक प्रकारे शिवपालगंज देशातल्या सगळ्याच खेड्यांचं प्रतिनिधित्त्व करतं.
शिवपालगंजवर सत्ता आहे वैद्यजी यांची! त्यांच्यावर शिरजोरी करण्यासाठी शिवपालगंजच्या हद्दीतल्याच भिखमखेडवी गावातला रामदिनही आहे. वैद्यजीच्या आशीर्वादाने चाललेलं छंगामल कॉलेज आहे. वैद्यजींच्याच आशीर्वादाने वागणारा आणि चालणारा कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, वैद्यजींचा छोटा मुलगा आणि कॉलेजच्या पोरांचा लिडर बनू पाहणारा रुप्पन बाबू आहे, वैद्यजींचा मोठा मुलगा आणि गावच्या व आसपासच्या सर्व गुंडांचा गुरू बद्री पेहेलवान आहे, त्याचा खास चेला छोटे पेहेलवान आहे, छोटेचा बाप कुसहरप्रसाद आहे, वैद्यजींच्या घरी 'नाथाघरच्या पाणक्या'च्या अवस्थेत राबणारा आणि सदैव अंडरवेअरवर असलेला सनिचर आहे. (याचं खरं नाव मंगलदास, पण गाव याला सनिचर) याच नावाने ओळखतं. वैद्यजी आणि रामदिन या दोन बैलांच्या झुंजीत हात न घालता कुंपणावर बसणारा गयादिन आहे, त्याची मुलगी बेला आहे, प्रिन्सिपलच्या विरोधी गटातले खन्ना मास्टर आणि मालवीय मास्टर आहेत.
यातली बेला वगळता सगळी पात्र इरसाल आहेत. बारा गावचं पाणी पिऊन वेळप्रसंगी दुसऱ्याला पाणी पाजणारी आहेत. राजकारणातले डावपेच खेळून दुसऱ्याला धोबीपछाड देणारी आहेत. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला परमार्थाला लावणारी आहेत. थोडक्यात मानवी स्वभावाचे जवळपास सगळे कंगोरे श्रीपाल शुक्ल यांनी या पात्रांच्या माध्यमातून मांडले आहेत.
शुक्ल या पात्रांच्या माध्यमातून लोकतंत्र, लोकशाही, प्रजासत्ताक, राजकारण, शिक्षणव्यवस्था, प्रेम, दारूबंदी, शेतीची प्रगती, सरकारी योजना यांचा खरपूस समाचार घेतात. त्यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली, तो काळही लक्षात घ्यायला हवा. तो काळ होता १९६४चा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेमतेच १६-१७ वर्षांनंतरचा!
शुक्ल यांचा जन्म १९२५ सालचा! म्हणजे या वेळी ते ३९ वर्षांचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या १०-१२ वर्षांमध्ये लोकांच्या स्वप्नांचा झालेला भ्रमनिरास त्यांच्या पिढीने अनुभवला होता. गोरा साहेब जाऊन त्याच्या जागी काळा साहेब आला, एवढाच काय तो बदल घडला, हे वास्तव ते पाहत होते, टिपत होते. ही बोच या कादंबरीत उतरली आहे.
कादंबरी वाचताना अनेकदा जयवंत दळवी यांच्या 'सारे प्रवासी घडीचे' या कादंबरीची आठवण होते. खासकरून सनिचरला वैद्यजी गावचा प्रधान बनवतात, तो प्रसंग वाचताना तर खूपच. 'सारे प्रवासी घडीचे' मधल्या केशा चांभाराची निवडणूक आणि सनिचरची प्रधानपदी झालेली निवडणूक, हे प्रकरण तर भन्नाट आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने शुक्ल यांनी निवडणूक जिंकण्याचे तीन हमखास 'देहाती' फॉर्म्युले लिहिले आहेत. त्याला त्यांनी गावांची नावंही दिली आहेत. रामनगरवाला, नेवादावाला आणि महिपालपूरवाला! थेट पक्षीय बलाबलाचा विचार करून त्यांचे सगळे लोक तुरुंगात पोहोचवायचे आणि आपलेही तेवढेच लोक तुरुंगात पोहोचवायचे. आपल्या बाहेर असलेल्या लोकांच्या जीवावर निवडणूक जिंकायची, हा रामनगरवाला फॉर्म्युला. नेवादावाला फॉर्म्युला त्या काळचे आणि आताचेही राजकारणी हमखास वापरतात. तो म्हणजे आपल्यामागे धर्माचं अनुष्ठान आहे, असं सांगणारा एखादा बुवाबाबा पकडणे आणि महिपालपूरवाला फॉर्म्युला म्हणजे मतदान केंद्रावरची घड्याळं पुढे करून ठेवणे आणि प्रतिपक्षाचे मतदार येण्याआधीच निवडणूक आटपून घेणे. (आजकाल ईव्हीएम मशीनमध्ये होणाऱ्या 'तांत्रिक बिघाडां'सारखंच काहीसं). आश्चर्य वाटेल, पण आजही गावागावांमध्ये हे फॉर्म्युले थोड्याबहुत फरकाने वापरले जातात.
आणखी एक नामी किस्सा येतो कुसहरप्रसादने आपल्याच मुलावर, छोटे पेहेलवानवर केलेल्या मारहाणीच्या आरोपाचा! या आरोपाची सुनावणी पंचांसमोर होते. पंच कुसहरप्रसादला काही उलटसुलट प्रश्न विचारतात. आपल्या बापाची चाललेली नाचक्की सहन न होऊन छोटे पेहेलवान पंचांना दमात घेतो आणि आपल्या बापूला घेऊन घरी जातो.
यात रुप्पन-बेला-बद्री असा प्रेमाचा त्रिकोणही येतो आणि लुप्त होतो. पण राजकारणात प्रेमासारख्या भावनेचाही वापर कसा बेमालुमपणे केला जातो, हेदेखील शुक्ल लिहून जातात. गावाची गोष्ट सांगण्याच्या बहाण्याने शुक्ल आधुनिक भारतात रसातळाला जाणाऱ्या मूल्यांबद्दल लिहून जातात. वानगीदाखल काही नमुने...
'गाव के बाहर एक लम्बा-चौडा मैदान था जो धीरे-धीरे ऊसर बनता जा रहा था। अब उसमें घास तक न उगती थी। उसे देखते ही लगता था, आचार्य विनोबा भावे को दान के रूप में देने के लिए यह आदर्श जमीन है।'
'पुनर्जन्म के सिद्धान्त की ईजाद दीवानी की अदालतों में हुई है, ताकि वादी और प्रतिवादी इस अफसोस को लेकर न मरें कि उनका मुकदमा अधूरा ही पडा है। इसके सहारे वे सोचते हुए चैन से मर सकते हैं कि मुकदमे का फैसला सुनने के लिए अभी अगला जन्म तो पडा ही है।'
'क्योंकि इस कॉलिज की स्थापना राष्ट्र के हित में हुई थी, इसलिए उसमें और कुछ हो या नहीं, गुटबन्दी काफी थी।'
'किसी जमाने में दार्शनिक लोग परमात्मा के अस्तित्व के बारे में बहस किया करते थे। अब वह बहस गेहूँ को लेकर होने लगी है।'
हे आणि असे अनेक चिमटे घेत श्रीलाल शुक्ल आपल्याला पावलोपावली वास्तवाची जाणीव करून देतात.
'राग दरबारी' वाचताना एक गोष्ट सातत्याने जाणवत होती. ती म्हणजे श्रीलाल शुक्ल यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली साधारण ५४ वर्षांपूर्वी! काही तपशील वगळता ही कादंबरी, त्यातली पात्रं, त्यातली ठिकाणं आणि मुख्य म्हणजे या कादंबरीच्या अनुषंगाने येणारे मुद्दे आजच्या काळाला तंतोतंत लागू पडतात. गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये झालेली आपली 'प्रगती' आणि 'विकास' ही किती वरवरची होती, मूलभूत गरजा सोडून ती कशी वेगळ्याच गोष्टींमधून मोजली गेली, हे खूप मस्त लक्षात येतं.
शाळा-कॉलेजांमध्ये होणाऱ्या लाथाळ्या, शिक्षणाचं अवमूल्यन, कॉ-ऑपरेटीव्ह सोसायट्यांमध्ये होणारे भ्रष्टाचार, वैद्यजींसारखे स्थानिक गावगुंड, त्यांच्या हाताखालचे पित्ते, हे शुक्ल यांनी केलेलं एका छोट्याश्या गावातलं काल्पनिक चित्रण काल्पनिक न राहता वास्तववादी बनतं. शिवपालगंजला काही अंशांनी गुणलं की आपला देश दिसायला लागतो आणि मग शिवपालगंजमधली ही परिस्थितीही गुणाकार होऊन आSS वासून समोर उभी राहते.
या परिस्थितीवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण काहीच तोडगा काढला नाही. उलट सिमेंटचे रस्ते, मॉल, काचेच्या इमारती म्हणजे विकास अशा भ्रामक कल्पनांमध्ये रमलो, हे आपलं अपयश की, आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या देऊन त्याच स्थितीत ठेवून स्वत: मात्र विकासाची नवनवीन शिखरं गाठणाऱ्या आपल्यातल्याच काहींचं यश, हे कळेनासं होतं.
'राग दरबारी'च्या या सूरांनी काही काळ हसायला येतं, हसता हसता अंतर्मुख व्हायला होतं आणि मग नकळत मन खिन्न होतं. हेच श्रीलाल शुक्ल यांच्या लेखणीचं यश म्हणायला हवं.
(ता. क. - हे पुस्तक वाचताना अनेक हिंदी शब्द अडले. गूगल साहेबांनीही त्या शब्दांचा अर्थ सांगायला नकार दिला. अशा वेळी माझे मित्र प्रभात पांडे, सुधा तिवारी यांनी अक्षरश: रात्री-अपरात्रीही त्या शब्दांचे अर्थ सांगितले. त्यांचे आभार.)
Rohan. You almost said a complete story..
ReplyDeleteNop... There is much more in the Novel...
Deleteसुंदर उपक्रम रोहन.. आणि परीक्षण किंवा पुस्तक परिचय जे काही लिहिलंयस तेही झक्कास झालंय...
ReplyDeleteThe Casino Sites of 2021 - Choegocasino
ReplyDeleteLooking for the best online casinos? Our experts have ranked and reviewed top casino sites and their bonuses. Learn more about 골드 카지노 our selection of online casinos