Skip to main content

Posts

Featured

आनंदाचा ठेवा!

जर्मन साहित्याची आणि साहित्यिकांची काही संमेलनं वगैरे होतात की नाही, माहीत नाही. साहित्य लोकाभिमुख व्हायला हवं, वाचनसंस्कृतीची वृद्धी वगैरे विषयांवर इथे परिसंवादही होत नाहीत. पण लोक वाचतात. इथलं सरकार लोकांच्या वाचनाची आवड आणखी समृद्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करतं...      काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो बघितला होता. फोटो भारतातल्या कुठल्या तरी रेल्वे स्टेशनचा होता. आपल्या स्टेशनांवर असते, तशी गडबड त्या फोटोतही दिसत होती. प्लॅटफॉर्मला एक गाडी लागली होती. लोक होते, हमाल होते. फोटो असला, तरी त्यातला कोलाहल नजरेला जाणवत होता. त्या कोलाहलाच्या मध्यभागी एका हातगाडीवर एक परदेशी (गोरा) बाप आणि त्याची लहान मुलगी बसले होते. त्या मुलीच्या हातात पुस्तक होतं आणि बापाच्या हातात Kindle! दोघंही वाचनात मग्न झाले होते. त्या फोटोसोबत एक मजकूरही होता. वाचन संस्कृती गप्पा मारून नाही, तर अशी कृती करून रुजते वगैरे आशयाचा! तो फोटो बघताना माझ्या डोळ्यासमोर बर्लिनमधली अनेक वाचनालयं आली. मी बर्लिनमध्ये आधी ज्या भागात राहत होतो, त्या Hanzaplatz या Underground स्टेशनमधून वर आलं की, बाजूलाच Hanza Bibliothek म

Latest Posts

बाबा नावाचा मोठा माणूस

एका लाजिरवाण्या इतिहासाचं स्मारक!

मनाला तरुण करणारी संध्याकाळ...

आम्ही कसले मध्यमवर्गी! (मी आणि सोन्या बागलाणकर)

घरमालकास (पुन्हां एकदा) मानपत्र!